
#औचित्य होते गुन्हे प्रतिबंधक महिना!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर पोलिसस्थानकाच्यावतीने पी आय मंजुनाथ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रतिबंधक महिण्याचे औचित्यसाधुन खानापूर शहरात जनजागृती मोहिम राबविण्यात आली.
खानापूर जांबोटी क्राॅस वरील नुतन बसस्थानकावर पोलिसानी जनजागृतीच्यावेळी बोलताना सांगीतले की,सार्वजनिक अथवा घरी चोरीच्या घटना घडल्यास आपत्कालीन परिस्थीचा सामना करण्यासाठी तात्काळ ११२ या नंबरवर काॅल करून पोलिसांची मदत घ्यावी.
चोरी करणारे चोरटे हे गर्दीचा फायदा घेतात.व प्रवाशांच्या बॅगमधुन पैसे लाबविणे ,महिलांच्या गळ्यातील दागीने लांबविणे.अशा घटना घडतात.यासाठी महिलानी सावधानता बाळगली पाहिजे. प्रवासात लक्ष ठेवून राहिले पाहिजे.निष्काळजीपणाने प्रवास करून नये.प्रवासात काळजी घेणे फार महत्वाचे असते.
अशी माहिती बुधवारी दि.११ रोजी गुन्हे प्रतिबंधक महिन्याचे औचित्य साधुन बसस्थानकावर प्रवाशाना दिले. तसेच शहरात वेगवेगळ्या गर्दीच्या ठिकानी जनजागृती मोहिम राबविली.
या गुन्हे प्रतिबंधक मोहिमेत खानापूर पोलिस स्थानकाचे पीएसआय एम बी बिरादार,क्राईम पीएसआय चन्नबसव बबली,पोलिस कर्मचारी जगदिश काद्रोळी, बी जी एलीगार,शेषाप्पा खामकेरू वइतर पोलिस कर्मचारी उपस्थित होते.