
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) येथील
पाटील गल्लीतील रहिवासी अशोक नारायणराव पाटील यांचे (वय ७१) यांचे शनिवार दि. ७ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी,जावई, नातवंडे, दोन बंधू असा परिवार आहे.
गर्लगुंजी ग्रामपंचायत माजी अध्यक्ष, विद्यमान सदस्य वंदना पाटील यांचे ते पती होत. त्यानी माऊली गर्ल्स हायस्कूल मध्ये काही वर्षे शिक्षकी सेवा बजावली होती.
अंत्यसंस्कार रविवार दि. ८ रोजी सकाळी ११ वाजता गर्लगुंजी येथे होणार आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे ते निष्ठावंत कार्यकर्ते होते.