
#क्रिडाज्योत पेटवुन स्पर्धाचा शुभारंभ!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर शहरातील श्री स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यम शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ शुक्रवार दि. ६ रोजी मोठ्य थाटात करण्यात आला. उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद इंग्रजी हायस्कूलचे चेअरमन अधिवक्ता चेतन मणेरीकर होते.तर उदघाटक म्हणून बेळगांव टिळकवाडी येथील सुप्रसिद्ध ” डिजिटल फिटनेस हबचे” संस्थापक आणि बांधकाम व्यावसायिक हर्षद कलघटगी उपस्थित होते.तर इतर मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
स्पर्धाचा शुभारंभ पाहुण्याच्याहस्ते क्रिडाज्योत पेटवून व शांतीदुत कबुतर उडवुन करण्यात आले.
यावेळी बोलताना चेअरमन अधिवक्ता चेतन मणेरीकर म्हणाले की
योग्य व्यायाम आणि आहाराचे उत्तम व्यवस्थापन केल्यास कोणतीही व्यक्ती दीर्घायुषी होऊ शकते असे मत प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी रोज मैदानी खेळात भाग घ्यावा ज्यामुळे संघ भावना आणि विद्यार्थी वर्गात एकी निर्माण होते असे मत व्यक्त केले.
या वेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्यदर्शी सुहास वामनराव कुलकर्णी, सहकार्यदर्शी गुलाब मांगीलाल जैन, माजी सचिव सदानंद श्रीपादराव कपिलेश्वरी उपस्थित होते. शाळेच्या प्राचार्या सौ.श्रद्धा दिपक पाटील यांनी स्वागत भाषण केले. शिक्षक दिपक सखदेव यांनी आभार मानले. सौ. ज्योती जांबोटकर यांनी सूत्र संचलन केले. या वेळी विद्यार्थ्यांनी उत्तम मार्च पास्ट आणि बहारदार नृत्य सादर केले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.