
#खानापूर तालुका क्राॅगेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडीनी घेतली दखल!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
हरसनवाडी (ता खानापूर ) जवळील गवळीवाड्यावरील गवळी बाबू कोकरे यानी आपल्या घरच्या मागे बांधलेल्या पत्र्याचे घर शुक्रवारी कोसळण्यात आल्याची माहिती खानापूर तालुका क्राॅगेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी याना समजताच शनिवारी दि ७ रोजी सकाळी सात वाजता खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतकेर ,हरसनवाडीचे पावलू फर्नाडिस सह घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी झालेला प्रकार गवळी बाबू कोकरे यानी खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी याच्या कथन केला.
यावेळी बाबू कोकरे म्हणीले की, माझ्या जुन्या घरच्या जागेवर पत्र्याचा शेड व्हावा म्हणून मालकीच्या शेतवाडीतील चार लाकडी वेळे आणून शेड उभारले.परंतु फाॅरेस्टे खात्याच्या गार्डने माझे ४० हजार रूपये खर्चून बांधलेले शेड न विचारता कोसळुन टाकले.त्यामुळे माझे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती दिली.
यावेळी खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यानी फाॅरेस्टर शिव शरण्णाप्पा याना फोन वरून धारेवर धरले. व फाॅरेस्ट खात्याने जेसीपी लावून झाडे कोसळली तरी चालतात.मग गरीब गवळ्याने आपल्याला राहण्यासाठी शेड उभारले ते तुम्ही का कोसळता असा सवाल करताच .त्यांची चुक दाखवुन दिली.
व गवळी बाबू कोकरे याना शेडे बांधुन राहण्याचा सल्ला दिला.
यावेळी खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर यानी गार्ड, फाँरेस्टर याना चांगले धारेवर धरताच वनखात्याने नरमाईची भूमीका घेतली.
गवळी बाबू कोकरे यानी धीर देऊण शेड उभारण्यासाठी मार्गदर्शन केले.
यावेळी हरसनवाडीचे पावलू फर्नाडिस, गवळीवाड्यावरील बाबू कोकरेसह अनेक गवळी उपस्थित होते.
खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी ,खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर आदीनी गरीब गवळी कुटूबाला धीर दिल्याबद्दल गवळीवाड्यातील नागरीकातुन समाधान पसरले आहे.