
खानापूर, ( सुहास पाटील )
खानापूर तालुक्यातील चापगाव ग्रामपंचायतचे अध्यक्ष गंगाव्वा सिद्दप्पा कुरबर , यांच्यावर बुधवारी (ता.४) रोजी होणाऱ्या अविश्वास ठरावाला, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या, धारवाड खंडपीठाच्या न्यायाधीशांनी, सोमवारी २ रोजी, स्थगिती आदेश दिला असून, याबाबतची पुढील सुनावणीची तारीख ६ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. अविश्वास ठराव कायद्याच्या चौकटीत अडकल्यामुळे, अविश्वास ठरावाबाबतच्या चर्चेला सद्या तरी पूर्णविराम मिळाला आहे.
चापगाव (ता.खानापूर) ग्रामपंचायत मध्ये एकूण ९ सदस्य संख्या असून ६ सदस्यांनी मागील महिन्यात त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. व या अविश्वास ठरावावर बुधवारी ४ रोजी, मतदान होणार होते. परंतु उच्च न्यायालयाने सदर अविश्वास ठरावावर स्थगिती आदेश दिल्याने, हा अविश्वास ठराव बारगळला आहे. यांचा अध्यक्षपदाच्या कालावधीला अजून केवळ ८ महिने बाकी आहेत. त्यामुळे या अविश्वास ठरावावर न्यायालयात कधी निर्णय होणार.?? हे पहावे लागणार आहे. मात्र, न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे दिलासा मिळाला आहे.
#अविश्वास ठराव व आरक्षणला स्थगिती गावच्या विकासाला खीळ!
तालुक्यातीलअनेक ग्राम पंचायत अध्यक्षाचा कार्यकाळ काही महिने राहिला आहे. मात्र अध्यक्ष व उपाध्यक्ष वर अविश्वास ठराव मांडले जात आहे. त्यामुळे साहजिकच गावाच्या विकासाला खीळ बसली आहे. तालुक्यातील २४१ गावे असून ५१ ग्राम पंचायती आहेत त्यामुळे प्रत्येक ग्राम पंचायत मद्ये तीन ते चार गावाचा सहभाग असल्याने अश्या प्रकारचे अविश्वास ठरावमुळे या गावातील विकासाला खीळ बसत आहे. खानापूर नगरपंचायत ला नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक २६ ऑगस्ट ला होणार होती मात्र न्यायालयाच्या स्थगिती मुळे अजूनही कोणत्याही निर्णय न आल्याने सदर दोन्ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे साहजिकच यामुळे विकासाला खीळ बसली आहे.
ग्रामपंचायत अध्यक्ष गंगवा सिद्धाप्पा कुरबर व उपाध्यक्ष मालुबाई अशोक पाटील याचे वकील आर एस हिरेमठ मॅडम व सुजित हिरेमठ यांनी काम पाहिले.