
१०० खांटाच्या रूग्णालय इमारतीचा पाया भरणी!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर (सुहास पाटील )
खानापूर शहारातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बांधण्यात आलेल्या ६० खाटाचा माता व बाल रूग्णालयाच्या नुतन इमारतीचा उदघाटन सोहळा तसेच नाबार्ड ३० योजनेंतर्गत १०० खांटांच्या तालुका रूग्णालयाच्या नविन इमारतीचा पायाभरणी कार्यक्रम उद्या बुधवार दि .११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठलराव हलगेकर उपस्थित राहतील .
तर १०० खांटाच्या तालुका रूग्णालयाचा पायाभरणी समांरभ कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री व बेळगावचे पालक मंत्री सतीश जारकिहोळी,महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेबाळकर,आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री दिनेश गुंडुराव व इतर मंत्री तसेच खासदार जगदिश शट्टर विश्वेश्वर , हेगडे कागेरी , प्रियांका जारकिहोळी, तसेच विधान परिषद सदस्य , आमदार ,जिल्हाधिकारी व इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.